पंढरपूर तालुक्यातील भालके गटाची निराशा....

पंढरपूर तालुक्यातील भालके गटाची निराशा....

महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला वंचित राहावे लागले आहे. शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक एक आमदार आहे. राष्ट्रवादी चे तीन आमदार आणि अपक्ष संजय शिंदे यांचा पाठिंबा असे चार आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात यापैकी एकाही आमदाराला स्थान दिलेले नाही. मंत्रीपदी बबनराव शिंदे संजय मामा शिंदे किंवा भारत नाना भालके यांची वर्णी लागेल अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात होत होती.  तसेच सोलापूर जिल्ह्यात चालू होती परंतु या चर्चेचा काही अर्थ पूर्ण झाला नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तसेच इतर कार्य कार्यर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करायचे हा प्रश्न अद्यापही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कायम ठेवला आहे असे आजच्या विस्तारत समोर आले आहे.
भारत नाना भालके हे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील एक तडफदार नेतृत्व असून तसेच माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे सहा वेळा आमदार झाले आहेत.  ज्येष्ठआमदार या मुद्द्यावर त्यांना संधी मिळेल अशी चर्चा चालू होती परंतु आमदार बबनराव शिंदे यांची प्रकृती अस्वास्थ्य असल्या कारणामुळे त्यांनी मंत्रिपदासाठी फारशी उत्सुकता दाखवली नाही. असे समर्थक सांगत आहेत. आमदार भारत नाना भालके हे राष्ट्रवादीसाठी नवे असले तरीही शरद पवार साहेब यांच्यासाठी जुने समर्थक म्हणून ओळखले जातात. शिंदे नसतील आमदार भारत भालके यांना संधी मिळेल अशी चर्चा तालुक्यात रंगत होती परंतु आमदार भारत नाना भालके यांनाही या विस्तारात डावलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकारी म्हणून आमदार संजय शिंदे यांना संधी मिळेल अशी शक्यता शेवटच्या टप्प्यात करण्यात आली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला संधी न मिळाल्याने जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अद्याप पर्यंत कायम आहे.
 पुणे जिल्ह्याला अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि दत्ता भरणे यांच्या माध्यमातून तीन मंत्रिपद मिळाले आहेत भरणे हे इंदापूरचे असून इंदापूर हे सोलापूर जिल्याच्या सीमाभागात भाग आहे. त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री भरणे यांची वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूरचे पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून शरद पवार, आर आर पाटील, दिग्विजय खानविलकर, जगन्नाथ पाटील यांच्या नंतर आता सोलापूरला यावेळी बाहेरचा पालकमंत्री येणार आहे...