माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर

अफवा न पसरवण्याचे कुटूंबियांचे आवाहन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे ब्रेन क्‍लॉट सर्जरीनंतर सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे मात्र स्थिर आहे. या दरम्यान त्यांच्या मृत्यूविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या याच अफवांवर आता कुटुंबियांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि कॉंग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी फेक न्यूज पसरवू नका असे आवाहन केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मष्ठा यांनी सांगितले आहे की, वडिलांची प्रकृती चिंताजनक जरी असली तरी कृपया खोट्या बातम्या पसरवू नका आणि मला फोन देखील करू नका. कारण हॉस्पिटलच्या अपडेट मिळण्यासाठी मला माझा फोन फ्री ठेवावा लागत आहे.

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0