सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Price Today, 2nd March 2021: सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात (gold rate down) पुन्हा एकदा घसरण झाली असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) एप्रिलच्या वायदा सोन्याचे दर ०.५४ टक्क्यांनी घसरले आहे.

एमसीएक्सवरील माहितीनुसार सोन्याच्या वायदा भावामध्ये २४४ रुपयांनी घसरण होऊन ४५,०७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका दर झाला आहे. तर चांदीच्या वायदा भावात १.३७ टक्क्यांची घसरण झालीय. त्यानुसार चांदीच्या दरात तब्बल ९२२ रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर काय?
'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळाच्या माहितीनुसार आज २२ कॅरेट सोन्याचा मुंबईतील भाव ४४,९६० रुपये इतका आहे. तर चेन्नईत ४३,४२० रुपये. दिल्लीत ४५,२१० रु, कोलकाता ४५,४७० रु, पुण्यात ४४,९५० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर मुंबई आणि पुण्यात ४५,९५० रुपये, कोलकातामध्ये ४८,३५० रु, दिल्लीत ४९,३१० रु, चेन्नईत ४७,३७० रु आणि अहमदाबादमध्ये ४७,५६० रुपये इतका आहे.