विविध उपक्रमांनी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवस साजरा

विविध उपक्रमांनी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवस साजरा

 

 

मंगळवेढा (प्रतिनिधी) धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा ७१ वा वाढदिवस शनिवार दि. ७ मार्च रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

दरम्यान सकाळी १० वा. पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे रेवनिल ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सोहळा पंढरपूर येथील एम.एस. सर्जन डॉ. एम. आर. टकले यांच्या हस्ते व मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रा. शिवाजीराव काळुंगे, डॉ. भीमाशंकर बिराजदार, पंढरपूर येथील भूलतज्ञ डॉ. राजेंद्र जाधव, डॉ.शरद शिर्के, डॉ. नितीन आसबे, सी. ए. आंनद करवंदे, सीताराम साखर कारखान्याचे चेअरमन समाधान काळे, डॉ. एन.बी. पवार, रामकृष्ण नागणे, युन्नूसभाई शेख, महादेव कोरे, धनश्री पतसंस्था व मल्टिस्टेटच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, डॉ. प्रिती शिर्के, धनश्री मल्टिस्टेटच्या संचालिका डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड, धनश्री पतसंसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनीता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर एम. आर. टकले यांनी रक्ताचे महत्व सांगत जगात रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान करून गरजू लोकांना जीवनदान देण्याचे आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य पार पाडावे असे त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी सुमारे जवळपास २२५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी धनश्री परिवाराच्यावतीने प्रत्येक रक्तदात्यांना जार व 2 लि. कुकर ही भेटवस्तू देण्यात आली. 

सायंकाळी ७ वा. सुरसंगम म्युझिकल ग्रूप मंगळवेढा प्रस्तुत महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद आयाज व इतर कलावंतांचा जुन्या - नवीन गाण्याचा गीतबहार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते व माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. बबनराव आवताडे, गायक मोहम्मद आयाज, शोभाताई काळुंगे, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड, ऍड. रमेश जोशी, डॉ. सुभाष कदम, नागेश फाटे, बाबुभाई मकानदार सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, भीमराव मोरे, फिरोज मुलाणी, डी बिल्डर्स दत्तात्रय बागल, तात्यासाहेब चव्हाण, मोहन जुंदळे, लक्ष्मण नागणे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

मोहम्मद आयाज यांनी ओंकार स्वरूपा, आज हम तुम ओ सनम, भुला साथी कोई दुजा, मुझे दोष ना देना जग वालो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, आन से उसके आये बहार, हर घडी बदल रही है रूप जिंदगी, आगे भी जाने ना तू, तुम्हारी नजर क्यों खपा हो गयी अशी एका पेक्षा अनेक गाणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमात पंढरपूरचे रफिक शेख, सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, अनिल गायकवाड, लक्ष्मी माने, यांनीही विविध गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. 

तसेच प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई मतीमंद शाळा लवंगी व एकलासपूर, तावशी येथील प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

त्याचबरोबर प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचा वाढदिवसानिमित्त दिवसभर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या जीवनसाथी या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षांव केला.

 

 

*महिला दिनानिमित्त आज व्याख्यान*

 

धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर रोड, एम.एस. ई. बी जवळ मंगळवेढा येथे आजच्या स्त्री समोरील आव्हाने? या विषयावर मोहोळ येथील डॉ. स्मिता पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मंगळवेढाच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी पं. स. सभापती प्रेरणा मासाळ, डॉ. राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड, मंगळवेढा आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर, चोखामेळानगरच्या सरपंच इंदुमती माने यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन धनश्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.