नागेशदादा फाटे यांच्या एन.पी कन्स्ट्रक्शन चा वर्धापन दिन साजरा

नागेशदादा फाटे यांच्या एन.पी  कन्स्ट्रक्शन चा वर्धापन दिन साजरा


पंढरपूर: प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव चे सुपुत्र, कांग्रेस सेवादल चे माजी जिल्हा अध्यक्ष आणि सहकार शिरोमणी सह साखर कारखान्याचे संचालक नागेशदादा फाटे यांच्या एन पी कन्स्ट्रक्शन कंपनी पंढरपूरचा १३ वा वर्धापन दिन आनंदाने साजरा करण्यात आला.
 या वर्धाापनदिन कार्यक्रमासाठी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  कल्याणराव काळे साहेब उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून   नंदकुमार दुुपडे हे होते.

 यावेळी एन पी फाटे या कंपनीने वतीने काढण्यात आलेल्या नवीन सन2021 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
  यावेळी बोलताना चेअरमन काळे म्हणाले की या कंपनीचे मालक नागेशदादा फाटे हे फार पूर्वीपासून आमच्या काळे कुटुंबावर निष्ठा ठेऊन आहेत, त्यांचे राजकीय आणि सामाजिक जीवन आम्ही जवळून पाहिलेआहे. स्व. वसंतदादा काळे यांचे राजकीय परिस्थितीत या तालुक्यातील काही कडवे निष्ठावन्त म्हणून काम केले आहे, त्यातील एक महत्वाचे स्थान असलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अशा या पूर्वीपासून आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या नागेशदादा यांच्या पाठीशी आपणही कायम उभे राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी अतिशय स्वकर्तुत्वाने ही कंपनी चालविली असून ,त्या कंपनीने चांगले नाव मिळविले आहे. या कंपनीचे13व्या वर्षीचा वर्धपान दिन साजरा होताना आपणाला व्यक्तिशः समाधान वाटले असून यापुढील कार्यास आपण सर्व विठ्ठल परिवार आणि काळे परिवार यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देत असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले आहे.

  या प्रसंगी नागेेेशदादा फाटे,उध्दव बागल, संजय बागल,शांतिनाथ बागल,ड्रा रमेश फाटे ,उमेश फाटे, निवृत्ती पाटील,विनय शिंदे,सलिम सय्यद, संदिप राॅय, गोपाळ कांबळे, वैजनाथ चौरे,  ,जयसिंग ताटे, रामचंद्र माळी, श्रेयस यादव, समाधान आदमिले, बाळासाहेब केदार, नाना डांगे, विक्रम आवचारे, नेताजी पासले, प्रदिप इंचुरे, शुभम कारभारी, गव्हाणे मॅडम,बाबू रकटे, आप्पा घोंगडे, हनुमंत पवार,सायबु मंडल, वैभव अनपट, सिकंदर बेन,अनुज कुमार, सुभाष पटेल, अशोक  शिंदे,शुभम फाटे, शशांक फाटे व एन पी  कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्व स्टाफ उपस्थित होते.