स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरवात

पंढरपूरः  गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निकला प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र. ६४३७ ची मान्यता मिळाली असून सोमवार (दि १० ऑगस्ट २०२०) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२० पर्यंत चालणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी.मिसाळ यांनी दिली. 

डिप्लोमा सन २०२०-२१ करीता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व कागदपत्रांच्या छायांकित प्रति अपलोड करणे (दि. १० ते २५ ऑगस्ट), कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती (दि. ११ ते २५ ऑगस्ट), संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे (दि. २८ ऑगस्ट), गुणवत्ता यादी मध्ये चुका असल्यास दुरुस्ती करणे (दि. २९ ते ३१ ऑगस्ट) व अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे (२ सप्टेंबर) आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डिप्लोमाचे तेरावे वर्ष असून उज्ज्वल यशाची परपंरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशाकरिता दहावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया दि.१० ऑगस्ट २०२० पासून ते दि. २५ ऑगस्ट २०२० सायं ५ वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड मोबा.क्र.९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.