कोर्टीच्या उपसरपंचपदी आगतराव बाबर यांची बिनविरोध निवड 

कोर्टीच्या उपसरपंचपदी आगतराव बाबर यांची बिनविरोध निवड 

कोर्टीच्या उपसरपंचपदी आगतराव बाबर यांची बिनविरोध निवड 
कोर्टी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आगतराव बाबर यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना अरुण घोलप, भैरु माळी, नगीना मुलाणी, गुलाब मुलाणी, संतराम संकपाळ, राजू शेंबडे आदी.

पंढरपूर,ता.30ः कोर्टी (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये प्रथमच दलित समाजातील आगतराव बाबर यांना  उपसरपंचपदाची संधी देण्यात आली. येथील उपसरपंचपदासाठी आज निवडणूक झाली. श्री.बाबर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड कऱण्यात आली. 

 

 

येथील उसरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी आज  सरपंच नगीना बशीर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. उसरपंचपदासाठी आगतराव बाबर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्याचे आल्याचे सरपंच नगीना मुलाणी यांनी जाहीर केले.

 

 

येथील ग्रामपंचातीच्या इतिहासामध्ये प्रथमच एका दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्याला उपसरपंचपदाता बहुमान मिळाला आहे. निवड झाल्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती अरुण घाेलप आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक भैरु माळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार कऱण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य  गुलाब मुलाणी, जब्बार शेख, राजू शेंबडे,  तात्या कारंडे,ग्रामविस्तार अधिकारी संतराम संकपाळ आदींसह  ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांनी फटक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली.