काही ना काही धडपड करणाऱ्याला एक दिवस पैसा मिळतोच...

काही ना काही धडपड करणाऱ्याला एक दिवस पैसा मिळतोच...

 

मेहूल, वय अंदाजे ३५… कोणतेच काम न करणारा, थोडासा मंद मुलगा, घरचेही वैतागलेले... त्यांच्या कॉलनीतील मैदानात एक दिवस एक सामाजिक संस्थेचा कार्यक्रम होता. मेहूल तेथे त्यांना मदत करू लागला. टेबल-खुर्च्या लावणे, चहा देणे, पाणी देणे इत्यादी... त्या बदल्यात संयोजक त्याला समोसा, वडापाव देत. त्या संस्थेच्या अशा अनेक कार्यक्रमाला जाऊ लागला. संयोजकांनी त्याला चांगले टी-शर्ट, कपडे देवू केले. त्या संस्थेच्या वर्गणीदारांना दरमहा त्यांच्या एका मासिकाचे वितरण करायचे होते. त्यांना कुरीअर कंपनीने रुपये ४०/- दर सांगितला; तो त्या सामाजिक संस्थेला परवडणारा नव्हता. त्या संयोजकांना मेहूलची आठवण झाली, त्यांनी त्याच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. ह्या मुंबईच्या उपनगरात ५०० वर्गणीदारांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर जाऊन मासिक पोच करायचे आहे. प्रत्येक मासिकाला रुपये ५/- प्रमाणे दोन हजार पाचशे रुपये मिळतील. मेहूलचा आनंद गगनात मावेना. त्याला दोन हजार पाचशे रुपये मिळणार ही खूप मोठी बाब वाटू लागली व आपल्याला कोणी जबाबदारी घेण्यास योग्य समजतो, हे बघून त्याला खूप मोठा आनंद झाला. तो ईमानदारीने प्रत्येकाचे घरी जात असे, मासिक देत असे. प्रत्येकाशी बोलत असे. तो आता मेहूलभाई या नावाने ओळखू लागला. त्याची भेट म्युच्युअल फंड कंपनीच्या अधिकाऱ्याशी झाली. त्याने त्याला या व्यवसायात येण्यासाठी मदत केली. सुरुवातीला व्यवसाय आणण्यासाठी तो त्याच्यासाठी काम करीत असे. मेहूल भाईच्या रोजच्या संपर्कामुळे त्याचा ग्राहकावर दांडगा विश्वास बसला. आज ते एक अग्रगण्य म्युच्युअल फंड एजन्सी चालवत असून त्याची ग्राहक संख्या ५०० आहे आणि त्यांचे ग्राहक तेच व त्यांचे परिचित आहेत, ज्यांना मेहूल हा मुलगा काही वर्षापूर्वी मासिके घरी पोहचवत असे. आज मेहूल भाईंचा पोर्टफोलिओ १८ कोटींचा असून त्याची वार्षिक कमाई १२ ते १६ लाखांची आहे. त्याची प्रभागातील प्रसिध्दी व परिचय पाहून एका पक्षाने त्यांना नगरसेवक पदासाठी तिकीट देवू केले होते, परंतु त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्याचा चांगल्या २२ मजली टॉवर मध्ये १८ व्या मजल्यावर २-बीएचके फ्लॅट आहे. त्यांची होंडा सिटी गाडी आहे. धडपड करणाऱ्या माणसाच्या घरी एक ना एक दिवस लक्ष्मी येतेच येते. कोणत्या कामाचे किती पैसे मिळतात, याचा विचार करू नका. काम सुरू करा, कामातून काम आणि त्यातून मोठे काम व मोठा पैसा मिळतोच.

जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... ज्याला आपण विझडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विझडम प्राप्त होण्यास मदत होईल.

वाचक मित्रहो, आमचे लेख आवडल्यास लाईक व कमेंट करा उत्कृष्ट कमेंटला मी लिहिलेले "उद्योजकता" पुस्तक भेट म्हणून दिले जाईल. आपले प्रश्न, प्रतिक्रिया यांचे आम्ही जरूर स्वागत करतो.

फेसबुक पेज लिंक:- https://bit.ly/39515PT

आपला,
प्रकाश भोसले
व्हॉट्स अप क्रमांक :- ९८६७८०६३९९

© प्रकाश भोसले
ISBN 978-81-929682-0-12

#entrepreneur #business #motivation #success #entrepreneurship #smallbusiness #entrepreneurlife #marketing #money #startup