रानू मंडलचा नवा लूक पाहून व्हाल थक्क!

रानू मंडलचा नवा लूक पाहून व्हाल थक्क!

रानू मंडलचा नवा लूक पाहून व्हाल थक्क!

काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आज एक बॉलिवूड स्टार आहे. रेल्वे स्टेशनवरून रानू थेट हिमेश रेशमियाच्या स्टुडिओमध्ये पोहोचली आणि तिने एक नाही तर तीन गाणी रेकॉर्ड केलीत. लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे गीत गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू अनेकांच्या नजरेत भरली, तिच्या आवाजाने हिमेश रेशमिया सारखा दिग्गज गायक व संगीतकारही प्रभावित झाला. त्याने आपल्या सिनेमात रानूला पार्श्वगायनाची संधी दिली. एकापाठोपाठ एक अशी तीन गाणी त्याने रानूकडून रेकॉर्ड करून घेतली. यानंतर तर रानू भलतीच लोकप्रिय झाली. सध्या याच रानूचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. होय, रानूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत रानूने हेवी मेकअप केला आहे.