छत्रपती शिवाजी महाराजांवर रितेश देशमुख बनवत आहे बायोपिक, अजय देवगण ने केला खुलासा

छत्रपती शिवाजी महाराजांवर रितेश देशमुख बनवत आहे बायोपिक, अजय देवगण ने केला खुलासा

अजय देवगण सध्या आपल्या आगामी 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच त्याची पत्नी काजोल त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे व सैफ अली खान हा चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. अलीकडे, बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, मराठा साम्राज्याच्या बायोपिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना कोणाला पाहायला आवडेल याबद्दल अजय देवगण याला प्रश्न विचारला होता. मात्र अजयने जराही वेळ न घेता बॉलिवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याच्या नावाची निवड केली. त्याने सांगितले की तो खरंच छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक बनवत आहे आणि त्यात त्याने रितेशला निवडले आहे. मात्र, अजयने या चित्रपटाविषयी अधिक माहिती उलगडली नाही.

दरम्यान, रितेश देशमुख याने चित्रपटाची औपचारिक घोषणा केली नसली तरी जेनेलिया देशमुख या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठा योद्धा तानाजी यांच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर ल्यूक केनी हा सम्राट औरंगजेबची भूमिका साकारणार आहे. सैफ अली खान हा उदयभान सिंगची भूमिका साकारणार आहे. 10 जानेवारी 2020 (Tanhaji: The Unsung Warrior Release Date) रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

https://youtu.be/cffAGIYTEHU?t=74