संतोष रणदिवे यांना छावा क्रांतीवीर सेनेकडून ‘समाजरत्न’ पुरस्कार

संतोष रणदिवे यांना छावा क्रांतीवीर सेनेकडून ‘समाजरत्न’ पुरस्कार
मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार स्विकारताना पञकार संतोष रणदिवे


      छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा योग भवन, पंढरपूर येथे पार पडला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याहस्ते दै.तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना समाजरत्न - 2021 पुरस्काराने, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    पञकार संतोष रणदिवे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील बातम्या देण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीच्या कालावधीतही लोकोपयोगी माहिती दिली. ते पंढरपूर येथील दै.तरुण भारत संवाद विभागीय कार्यालयात साडेतीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी पञकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
      यावेळी संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर, चेअरमन अभिजीत पाटील, जि.प.सदस्या शैलाताई गोडसे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, एस.के.चव्हाण, केंद्रिय अध्यक्ष प्रताप कांचन पाटील, चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग मोरे, प्रदेश चिटणीस धनराज लटके, सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताञय जगताप, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश माने, पश्चिम महा.संघटक योगेश पाटील, निवृत्ती इंगळे महाराज आदी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.