मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्गी लावा शैला गोडसे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकाचे काम तात्काळ मार्गी लावा  शैला गोडसे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

 

 प्रतिनिधी

मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर यांच्या स्मारकास मान्यता मिळालेली आहे. या कामासाठी यापूर्वीच्या  शिवसेना-भाजप सरकारच्या कार्यकालावधीमध्ये निधीची तरतूद झालेली आहे असे समजते. तथापि जागेअभावी अद्यापर्यंत कामास सुरूवात करण्यात आलेली नाही. ते काम अद्यापही प्रलंबित आहे. 

 

तसेच मंगळवेढा येथील श्री संत बसवेश्वर महाराज यांचे भक्त संपूर्ण देशभरात असून त्यांच्या भक्त समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक झाले तर मंगळवेढा शहराचा विकास होवून या शहर व तालुक्यातील व्यापार, उद्योग वाढून बेरोजगाराच्या हाताला काम मिळणार आहे.  तसेच शहराचा नावलौकिक देशपातळीवर होईल. या दृष्टीकोनातून श्री संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद व जागेची त्वरित उपलब्धता करून  त्वरित काम सुरू करण्यासाठी संबंधित विभागास सूचना करण्यात याव्यात. अशीही मागणी शैला गोडसे यांनी केली आहे. 

 

 

संत श्री बसवेश्वर महाराज स्मारकासाठी चे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी केलेली असतानाच संत श्री चोखोबा स्मारकासाठी रुपये पाच कोटीची तरतूद करून त्याचेही काम त्वरित सुरू करणेबाबत नगरविकास मंञी यांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे त्यांच्याकडून निश्चितपणे विचार केला जाईल असे वाटते.

शैला गोडसे

जिल्हा प्रमुख शिवसेना