रात्री उशीरा झोपणे, झोपेच्या वेळेत मोबाईल फोन, टिव्ही अथवा लॅपटॉप पाहणे, सकाळी उशीरा उठणे अशा सवयींमुळे झोपेच गणित जूळत नसल्याचे पहायला मिळते. वर्क फ्रॉम होममुळे सतत एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे झोपेवर परिणाम होतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक विचारांच्या संपर्कात आल्यामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.
लॉकडाउनमुळे घरबसल्या सगळी कामं होत आहेत. त्यामुळे आवश्यक तितकी शरीराची हालचाल होत नाही. परिणामी, रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, झोप न येणं याचे प्रमाण अधिक वाढले आहे. दिवसा झोपणे, काम करता करता अवेळी झोप काढणे यामुळे रात्रीच्या झोपेवर विपरित परिणाम होत असल्याचे पहायला मिळते.
झोप न येण्यामागची कारणे कोणती?
शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होणे.
वर्क फ्रॉम होममुळे कामाच्या वेळेत झालेले बदल.
घरी राहिल्याने स्क्रीनटाइममध्ये वाढ होत आहे आणि मोबाइल फोन्सचा अतिवापर होत आहे.