पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महामुनी यांची निवड तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची निवड

पंढरपूर पांचाळ सोनार समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग महामुनी यांची निवड तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची निवड

पंढरपूर पांचाळ समाजाच्या अध्यक्षपदासहित विविध पदाधिकऱ्यांचा निवडीसाठी येथील संत नरहरी महाराज समाधी मंदिर येथे आयोजित समाज बांधवाच्या बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे निवडी करण्यात आल्या.यामध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले पांडुरंग महामुनी हे ३३ मते घेऊन विजयी झाले तर उपाध्यक्षपदी विशाल कोन्हेरीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.     
     या निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष पांडुरंग महामुनी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत या पदाच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी आपण अविरत परिश्रम घेऊ अशी ग्वाही दिली.या निवडणूक प्रक्रियेसाठी गजेंद्र घोडके यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले तर यावेळी गणेश पंडित,अंनत कासेगावकर,मनोज कासेगावकर,संजय वेदपाठक,केशव महामुनी,सदानंद महामुनी,रमेश पंडित,किशोर दीक्षित,स्वप्नील कमसल,सूरज क्षीरसागर,विजय कासेगावकर,सुमित पारखे,प्रशांत महामुनी,राजेंद्र कासेगावकर,बाळासाहेब महामुनी (गोडबोले) आदी उपस्थित होते.