Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीपाठोपाठ आता त्याचा सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे, असं म्हणत, निवृत्ती जाहीर केली. (Cricketer Suresh Raina Announce Retirement)

सुरेश रैनाने 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 768 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक 7 अर्धशतकांचा समावेश आहे.