जाणून घ्या योगासनांविषय माहिती नसलेल्या गोष्टी

योगाभ्यास करताना... अलीकडच्या काळात जवळजवळ सर्वांनाच योगाभ्यासाचे धडे गिरवताना आपण बघत आहोत, पण योगाभ्यास करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे

जाणून घ्या योगासनांविषय माहिती नसलेल्या गोष्टी

 

आता या कल्पनेच्या जगातून थोडं बाहेर येऊन आपल्या अवती-भोवती बघा. आपण कशा हवेत जगतो? किती प्रदूषित हवा प्रत्येक क्षणाला आपल्या फुप्फुसात जाते? कोणते अन्नपदार्थ खातो? कसं अन्‌ कुठं खातो? आपल्या पानात येणाऱ्या भाज्यांचे उत्पादन करताना किती कीटकनाशके फवारलेली असतात? आपण किती झोपतो? या आणि अशा असंख्य अनुत्तरित प्रश्नां च्या काटेरी जाळ्यात तुम्ही अडकलाय, असं तुम्हाला आता वाटत असेल! अशी परिस्थिती असताना 'माणसानं आजारी पडूच नये,' अशी कल्पना तरी कशी करणार बरं? पण, थांबा. हे वाचून 'आता हातातून मॅच गेली,' अशी काही स्वतःची अवस्था करून घेऊ नका. इतक्या त कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. कारण, अजूनही काही गोष्टी निश्चिीतच आपल्या हातात आहेत. त्यातून आपल्या प्रत्येकाला 'फिटनेस' ठेवता येईल. तो वाढवता येईल. पर्यायानं शरीराचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळं 'माणसानं आजारी पडू नये,' या दृष्टीनं प्रयत्न करण्याची हीच आता खरी वेळ आहे. आणि हो, हे पाऊल तुमचं तुम्हालाच टाकावं लागणार आहे. त्यात प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल योगशास्त्र...

 

योगशास्त्र ज्याला आपण आता 'योग' किंवा इंग्रजीकरणात त्याला 'योगा' म्हणतो. ही खरी आपली प्राचीन भारतीय परंपरा आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रात 'माणसानं आजारी पडूच नये' अशी व्यवस्था केल्याचं आपल्याला टप्प्या-टप्प्यावर स्पष्टपणे दिसतं. त्यामुळं फक्त भारतीय नाही, तर सर्व जगानं योगशास्त्र स्वीकारलं आहे. योगचं महत्त्व जनसामान्यांना चांगलंच समजलेलं असल्याचं दिसतं. दूरच दूर पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर योगासनं करणारी तरुण मुलं-मुली आपण बघतो. त्याच वेळी उत्तरेला विस्तीर्ण पसरलेल्या हिमालयाच्या उत्तुंग हिमशिखरांवरही योगाध्याय करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तसेच, राजस्थानचं थारचं वाळवंट असो, की दक्षिणेकडील सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात वाड्या-पाड्या असो, येथील प्रत्येक घराच्या उंबऱ्यापर्यंत योगशास्त्र पोचलं आहे. 'योगा'ला, योगशास्त्राला, योगाभ्यासाला असे काहीही नाव द्या; पण त्याला आपल्या जीवनशैलीचा भाग बनविण्याची हीच ती वेळ आहे. त्याला निमित्त आहे ते 'पुणे हेल्थ डे'चे!

बहिरंगातून अंतरंगाचा प्रवास
बहिरंगातून अंतरंगात जाण्याचा प्रवास म्हणजे योग आहे. या योगसाधनेतूनच शरीर व मन हे शुद्ध, सुदृढ व संतुलित होतं. ही निरंतर व दीर्घकाल चालणारी साधना आहे. योगासनांचा विचार केल्यास शरीर व मनास सुदृढता, लवचिकता व बळकटी प्राप्त करून देण्याचं काम योगासनंही करतात. शरीर व मनावर चांगले संस्कार हे योगाभ्यासाच्या निरंतर सरावातून होतात.

 

असा करा योगासनांचा दररोज सराव
रोज ११ वेळा ओंकाराचा जप करावा. त्यामुळं मनशांती मिळून तुमचा पुढील सराव चांगला होतो.

त्यानंतर सूर्यनमस्काराचा सराव करावा. १२ आकड्यांमधील सूर्यनमस्कार सावकाश व व्यवस्थित घालावा. साधारणतः प्रत्येक स्थितीत ५ ते १० सेकंद थांबून सूर्यनमस्कार घालावेत. घाई करू नये. त्यानंतर थोडीशी विश्रांती घ्यावी व आसनांचा सराव सुरू करावा.

यामध्ये उभ्याची आसने, बसून, पाठीवर, पोटावर झोपून करण्याची काही आसने करावीत. आसने करताना लवचिकतेला महत्त्व न देता शरीराच्या योग्य स्थितीला द्यावे व आसन स्थिर ठेवण्याचा यथाशक्ये प्रयत्न करावा. आसनामध्ये दीर्घ श्व सनाकडे लक्ष द्यावे.

 

त्यानंतर शवासन किंवा मकरासन करावे. यामध्ये पूर्ण शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करावा व श्वनसन हे दीर्घ असावे.

प्राणायामाचे दोन किंवा तीन प्रकार करावेत. अनुलोम विलोम, भस्रिका, उज्जायी, भ्रामरी असे प्राणायाम करावेत. त्यानंतर थोडावेळ शांत बसून राहावे व श्वा साकडं लक्ष द्यावं व नंतर आपल्या पुढील बाकीच्या कामास सुरुवात करावी. दिवसाची सुरवात अशी केल्यास दिवस अगदी आनंदी व उत्साही जाईल.

योगाभ्यास करताना... अलीकडच्या काळात जवळजवळ सर्वांनाच योगाभ्यासाचे धडे गिरवताना आपण बघत आहोत, पण योगाभ्यास करत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती घडविणारा योग मानवजातीस एक वरदानच ठरत आहे. त्यामुळं भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून हे योगशास्त्र केव्हाच साता समुद्रापार पोचलं आहे. परदेशातील नागरिकांना योगशास्त्राप्रमाणं जीवनशैलीचा स्वीकार केला आहे.

अष्टांग योगमध्ये सांगितल्याप्रमाणं, मानवाचा व्यक्तिमत्त्व विकास किंवा परिपूर्ण व्यक्तिमत्त्व हे योगाभ्यासातूनच घडू शकतं. कारण, योग हा प्रथम मानवी मनावर व नंतर मानवी शरीरावर काम करत असतो. मन खंबीर असल्यास शरीर आपोआप सुदृढ होते. त्यामुळंच योग ही मानवास मिळालेली दिव्यशक्ती आहे. योगाभ्यास करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

श्वा-स
योगाभ्यास करत असताना पूर्ण लक्ष श्वा-सावर केंद्रित करावं. आसनांमध्येसुद्धा दीर्घ श्वहसन करण्याचा प्रयत्न करावा.

शरीराची स्थिती
आसन, प्राणायाम व ध्यान करत असताना शरीराची स्थिती ही योग्य रचनेतच ठेवावी.

मनाची अवस्था
योगाभ्यास करत असताना पूर्ण लक्षपूर्वक शरीर व श्वाास याकडं लक्ष केंद्रित करावं व बारकाईनं त्याची अनुभूती घ्यावी. तरच त्याचे लाभ आपल्याला मिळतील.

खेळाडूंसाठीही योगाभ्यास अतिशय उपयोगी आहे. जे नित्यनियमाने मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, किंवा निरनिराळ्या खेळांमध्ये कौशल्य दाखवतात अशा खेळाडूंसाठीही योग हा वरदान ठरलेला आहे. खेळातील दुखापती कमी करण्यासाठी आसनांचा सराव रोज करावा.