विज्ञान महाविद्यालयात लाल लजपत राय यांची पुण्यतिथी साजरी

Hpn

विज्ञान महाविद्यालयात लाल लजपत राय यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे जहाल स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांची 91 पुण्यतीथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे होते. याप्रसंगी नियोजन कमिटीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. दीपक रिटे म्हणाले लाल-बाल-पाल या प्रसिद्धी त्रयींमधी, पंजाब केसरी म्हणून ओळख असलेले लाला लजपत राय यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला आहे. प्रसंगी ते प्राणत्याग करण्यास सुद्धा मागे हटले नाहीत. सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करीत असताना इंग्रज सैन्याकडून बेदम मारहाण करण्यात आली त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून प्रत्येकाने आपले स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी पार पाडावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे असे ते म्हणाले.

यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.