विज्ञान महाविद्यालयात सत्यशोधक महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

विज्ञान महाविद्यालयात सत्यशोधक महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

सांगोला

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे सत्यशोधक महात्मा फुले यांची 129 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे होते.

यावेळी राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. भंडारे म्हणाले, महात्मा फुले यांनी सर्वसामान्य लोकांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी निर्माण केलेल्या शाळांमधून समाज सुधारकांची एक मोठी फळीच निर्माण झालेली पाहायला मिळते. त्यांनी समता आणि शिक्षणाचे महत्व जाणले आणि शूद्रातिशूद्रास, शेतकऱ्यास समजावून सत्यशोधक बनविले. तो वारसा आपण जपल्यास येणाऱ्या काळात आपण जगात महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. यावेळी प्रा. भगवान नवले, प्रा. डॉ. काकासाहेब घाडगे, प्रा. डॉ. किसन माने, प्रा. किसन पवार, प्रा. डॉ. रघुनाथ फुले, प्रा. रावसाहेब गडहिरे, प्रा. संतोष भोसले, प्रा. हणमंत कोळवले, प्रा. बाळकृष्ण कोकरे यांचेसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित

प्रास्ताविक व सूत्रसंचालन नियोजन समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. अशोक कांबळे यांनी मानले.