गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पीडितेकडे 10 लाखांची मागणी

गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पीडितेकडे 10 लाखांची मागणी

कोल्हापूर : गुंगीचे औषध पाजून  विवाहित महिलांवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचाही आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. शाहूपुरी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे, तर एका संशयिताच्या पत्नीवर देखील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान बागवान आणि आरिफ शेख अशी संशयित आरोपींची नावं आहे. पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत विवाहितेवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचाही दावा केला जात आहे. 

शाहूपुरी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे, तर एका संशयिताच्या पत्नीवर देखील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान बागवान आणि आरिफ शेख अशी संशयित आरोपींची नावं आहे. पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत विवाहितेवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचाही दावा केला जात आहे.