पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स, 22 वर्षीय तरुणाला अटक

पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तलवार-पिस्तुलीसह डान्स, 22 वर्षीय तरुणाला अटक

पुणे : पुण्यातील हत्या झालेल्या सराईत गुंडाच्या वाढदिवसाला त्याच्या टोळक्यातील सदस्यांनी तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केले. शस्त्र वापरण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मयत गुंड भावेश कांबळेच्या नावाने घोषणाबाजी करत टोळक्याने तलवार-पिस्तुल नाचवलं होतं.भावेश कांबळे या पुण्यातील सराईत गुंडाचा गेल्या वर्षी खून झाला होता. मात्र त्याची पिलावळ अजूनही दहशत माजवण्यासाठी तलवार घेऊन डान्स करताना दिसत आहे. भावेश कांबळेचा वाढदिवस साजरा करताना टोळक्याने तलवारी आणि पिस्तूल हवेत फिरवत सेलिब्रेशन केले. हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. अक्षय उर्फ प्रसाद शशिकांत कानिटकर (वय 22 वर्ष, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गेल्या वर्षी सराईत गुन्हेगार भावेश कांबळे याची हत्या झाली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खून झालेल्या आरोपीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी सात जुलै रोजी 10 ते 15 जण जमले होते. त्यांनी हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली होती. तसेच, आरोपीच्या नावाने घोषणाबाजी केली होती.जमलेल्या टोळक्यामध्ये अक्षय कानिटकर देखील होता. तो बिबवेवाडीतील दत्त मंदिराजवळ असल्याची माहिती पोलिस कर्मचारी उत्तम तारू व मितेश चोरमाले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांकडे दिले आहे.