रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पंढरपूर शहर कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच पार पडली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पंढरपूर शहर कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच पार पडली.

पंढरपूर: नगरपरिषदेच्या आगामी निवडणुका द्विसदस्यीयप्रभाग रचनेनुसार घेण्यात येतील या मंत्रीमंडळ निर्णयाचे स्वागत या बैठकीत करण्यात आले.पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे.या निवडणुकीपूर्वी सरकार ओबीसी आरक्षण देण्यास कमी पडले आहे. तथापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तांत्रिक बाबीत अडकून न पडता पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत ओबीसी बंधुभगिनींना ३०% जागांवर लढण्यास संधी देणार आहे त्यामुळे ओबीसी समाजाचे मनोबल वाढणार आहे. अशाप्रकारचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतल्यास सरकारच्या आरक्षणाची वाट पाहण्याची आवश्यकता राहणार नाही.

आरक्षण ही सामाजिक बांधीलकी असून आमचा पक्ष ती जपण्याचा प्रयत्न करत आहे.इतर जागांप्रमाणेच या ३०% जागांवर आम्ही विशेष लक्ष देऊन हमखास यश संपादन करू. असा विश्वास पंढरपूर शहर सरचिटणीस प्रशांत लोंढे यांनी व्यक्त केला.या बैठकीस शहर अध्यक्ष अरविंद कांबळे व  कार्यकारिणी सदस्य तसेच पंढरपूर शहर युवक आघाडीचे अध्यक्ष विशाल मांदळे आपल्या कार्यकारिणीसह उपस्थित होते.या बैठकीस रिपाई प्रदेश संघटन सचिव सुनिल सर्वगोड, तसेच रिपाई युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. किर्तीपाल सर्वगोड यांनी मार्गदर्शन केले.