भाजपला आपले शिलेदार फुटण्याची भीती असल्याने सत्ताबदलाच्या वावड्या-आमदार अमोल मिटकरी

भाजपला आपले शिलेदार फुटण्याची भीती असल्याने सत्ताबदलाच्या वावड्या-आमदार अमोल मिटकरी

अहमदनगर: सत्ता न मिळाल्याने भाजप मध्ये अस्वस्थता आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणें पासून चंद्रकांतदादां पर्यंत सत्ताबदलाची भविष्य व्यक्त करत आहेत. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद मधील केलेले भावी सहकार्याचे वक्तव्य हे भाजप साठी नसून इतर एखाद्या जुन्या सहकार्याबद्दल असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात आ.निलेश लंके यांच्या विकासनिधीतून सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ.मिटकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकार पुढची पंचवीस वर्षे टिकणार आहे आणि त्यातून नैराश्याने भाजपचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत, असे मिटकरी यावेळी म्हणाले.