शिर्डीत सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करून राहाता येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

शिर्डीत सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करून राहाता येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

अहमदनगर: जिल्ह्यातील राहाता येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन कॉलेज तरूणीला फसवून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर नेवासा येथील तरुणानी मुलीवर अत्याचार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादी वरून आरोपीला पोक्सो कायदा अंतर्गत अटक केली आहे..

 23 जून 2020 रोजी आरोपी सौरभ विठ्ठल कातकाडे राहणार नेवासा याने माझा मोबाईल नंबर प्राप्त करून व्हाट्सअप माध्यमातून माझ्याशी जवळीक साधली मी त्याला टाळाटाळ करत असताना तो पुन्हा माझ्याशी जवळीक करू लागला तुझ्या घरी सांगेन असे धमकावून त्याने मला जबरदस्तीने लोणी येथे नेऊन अत्याचार केला आणि माझ्यासोबत जबर दस्तीने  फोटो काढले ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन माझ्याकडून त्याने 1 लाख 37 हजार रुपये जबरदस्तीने घेतले या सर्व त्रासाला कंटाळून मी माझ्या घरी सांगितले घरच्यांच्या सोबत मी पोलिसात तक्रार दाखल केली . सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आरोपी सौरभ याने मी पुण्यात ऍडमिट आहे तू माझ्याशी बोलत नाही म्हणून मी गोळ्या खाल्ल्या मला उपचारासाठी पैसे लागत आहे म्हणून त्याने माझ्याकडे पैसे मागितले मी घाबरून घरातील  सतरा हजार रुपये सौरभ कातकडे याच्या फोन पे अकाउंट वर पाठवले त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी २० हजर रूपेय आरोपी चा मित्र तेजस सोनवणे यांच्याकडे रोख स्वरूपात दिले. त्यानंतर आठ दिवसांनी परत तुझ्या टेन्शनमुळे गोळ्या खाव्या लागल्या आता मला अजून एक लाख रुपये खर्च आला आहे त्यासाठी परत एक लाख रुपयाची मागणी करत पैसे न दिल्यास आपले फोटो वायरल करेल अशी धमकी देत माझ्याकडून एक लाख रुपये घेतले.आरोपी सौरभ विठ्ठल कातकाडे वय 21 राहणार रानमळा ता. नेवासा जिल्हा अहमदनगर याच्याविरुद्ध खंडणी व बलात्काराचा गुन्हा भादवि कलम 376, 354,385,504 507,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपी चे मित्र कुणाल कातकाडे, तेजस सोनवणे,किशोर लोखंडे नेवासा यांच्याविरुद्ध पण गुन्हा दाखल झाला आहे याबाबत राहत्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी आधिक माहिती दिलीये.