BJP-MNSची युती होणार चंद्रकांत पाटील 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांच्या भेटीला....

BJP-MNSची युती होणार चंद्रकांत पाटील 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे  यांच्या भेटीला....

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'कृष्णकुंज' या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. आज (6 ऑगस्ट) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. मागील काही दिवसांपासून मनसे  आणि भाजपची जवळीक वाढत आहे. अशावेळी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसेची युती होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.राज्यात आगामी काही महिन्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी भाजप महाविकास आघाडीसमोर एकटी पडू शकते. अशावेळी शिवसेनेसारख्या पक्षाला टक्कर देण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेऊ शकते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची नाशिकमध्ये चंद्रकांत पाटलांशी भेट झाली होती. अशावेळी आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांची भेट होत असल्याने भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

'आमचं म्हणणं आहे की, देशाचा नागरिक कुठेही राहू शकतो. देशातील दोन राज्यात परमिटची कुठे गरज आहे का? हो.. स्थानिक लोकांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के जागा हा निर्णय आधीच झाला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे. राजकारणामध्ये एखाद्या घटनेमधून कायमचे निर्णय केले तर त्यातून पक्षाचं देखील नुकसान होतं आणि समजाचं देखील.'

'त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडे जायचंच नाही कधी.. असं आपण म्हणू शकत नाही किंवा तसं काही कारण नाही. पण दुसऱ्या बाजूने युती करायची असा प्रस्तावही कुठला नाही. मी फक्त सदिच्छा भेट घेणार आहे.' असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.राज्यातील सत्ता आणि आपला मित्र पक्ष गमावल्यानंतर राज्यात नव्या राजकीय मित्राची मदत भविष्यात भाजपला भासू शकते. अशावेळी मनसेने जर भाजपसोबत युती केल्यास त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. हेच जाणून आता नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. ज्यामुळे भाजप-मनसेची युती होण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.