उद्या बसपा चे मंगळवेढ्यात धरणे आंदोलन

उद्या बसपा चे मंगळवेढ्यात धरणे आंदोलन

देशभरात तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात मागासवर्गीयांवर जातीवादी लोकांकडून सातत्याने अन्याय,अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच मागासवर्गीयांना योग्य न्याय मिळत नसल्या कारणाने प्रशासन तसेच कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे, प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे या घटनेकडे लक्ष देण्यासाठी व त्वरित कारवाई करण्याबाबत बहुजन समाज पार्टी मंगळवेढा तालुका यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव आप्पासाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा अध्यक्ष रवी सर्वगोड यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 12 वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. अशा स्वरूपाची माहिती बहुजन समाज पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रभारी प्रेमचंद सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.