५०,०००/- पेक्षा कमी गुंतवणुकीत सुरु होऊ शकणारे ट्रेडिंग व सर्व्हिस व्यवसाय

५०,०००/- पेक्षा कमी गुंतवणुकीत सुरु होऊ शकणारे ट्रेडिंग व सर्व्हिस व्यवसाय
५०,०००/- पेक्षा कमी गुंतवणुकीत सुरु होऊ शकणारे ट्रेडिंग व सर्व्हिस व्यवसाय

कमी गुंतवणुकीत काय व्यवसाय आहेत हा अनेकदा विचारला जाणारा प्रश्न. आणि यावर नेहमीप्रमाणे पठडीतले दिले जाणारे उत्तर म्हणजे पापड, लोणचे, मसाले बनवा. पण हे व्यवसाय आता अति झाले आहेत. अति उत्पादकांमुळे यात मार्केटिंग साठी सुद्धा बरेच कष्ट घ्यावे लागत आहे.
कमी गुंतवणुकीत आणखीही बरेच चांगले पर्याय आहेत. यात मुख्यत्वे ट्रेडिंग आणि सर्व्हिस क्षेत्रातील व्यवसाय आहेत. इथे काही ट्रेडिंग आणि सर्व्हिस क्षेत्रातील चांगले उत्पन्न देणारे व्यवसाय दिले आहेत.

ट्रेडिंग व सर्व्हिस क्षेत्रातील काही निवडक व्यवसाय

१. साॅफ्ट टाॅईज (ट्रेडिंग)
तुम्ही सॉफ्ट टॉईज स्वतः बनवून विकू शकता किंवा होलसेल रेट मध्ये आणून स्थानिक मार्केट मध्ये विक्री करू शकता. स्वतःचे दुकान किंवा स्थानिक खेळणी विक्रेत्यांना विक्री करू शकता. स्वतः बनवले तर स्थानिक विक्रेत्यांना विक्री करणे सोपे जाईल. पण सुरुवातीला शक्यतो ट्रेडिंग करावी. कारण उत्पादनासाठी तेवढा अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच कामगारांना सांभाळावे लागते. त्यापेक्षा सुरुवातीला काही वर्षे ट्रेडिंग जास्त चांगले आहे.

गुंतवणूक -
रु. १०-२० हजार, स्वतः बनवणार असाल तर
रु. १५-४० हजार, होलसेल मध्ये खरेदी करणार असाल तर (ट्रेडिंग साठी)

__________

२. हँडक्राफ्ट (ट्रेडिंग)
हँडक्राफ्ट म्हणजे हाताने बनविलेल्या वस्तू. या वस्तू तुम्ही स्वतः बनवू शकता, किंवा मार्केट मधून ठोक भावात खरेदी करून स्थानिक बाजारात विक्री करू शकता. पर्यटन स्थळी या उत्पादनांना जास्त मागणी असते. स्वतः बनवणार असाल तर एक दोन क्राफ्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, पण सुरुवातीला स्वतः काही बनवावे आणि मार्केटमधून ठोक भावात काही घेऊन यावे अशा प्रकारे काम करावे. ट्रेडिंग मध्ये हा व्यवसाय जास्त चांगला आहे. स्वतःचे शॉप सुरु करून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता.

गुंतवणूक -
ट्रेडिंग साठी रु. २५-४० हजार
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकेल
__________

३. आॅनलाईन फाॅर्म फाईलींग (सर्व्हीस)
कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून देणे. यार नोकरीचे अर्ज, शाळांचे अर्ज, शासकीय अर्ज ई प्रकारचे सर्व फॉर्म्स येतात. हे सर्व फॉर्म ऑनलाईन भरणे आता सक्तीचे झालेले आहे.

गुंतवणूक
शॉप सेटअप रु. १०,०००/-
कॉम्प्युटर इंटरनेट १५,०००/-
इतर ५,०००/-
__________

४. गारमेंट विक्री (ट्रेडींग)
मोठ्या मार्केट मधून व्होलसेल गारमेंट्स खरेदी करून स्थानिक बाजारात विक्री करावी. मोठ्या शहरात मोठा सेटअप लागेल, परंतु छोट्या शहरात, गावांत कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल. नफा चांगला आहे. विक्री करीत जास्त अडचण येत नाही.

गुंतवणूक - ४०-५० हजार
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकेल
__________

५. ईमीटेशन ज्वेलरी (ट्रेडींग)
व्होलसेल मार्केटमधून ज्वेलरी खरेदी करून स्थानिक मार्केट मध्ये विक्री करणे हा चांगला व्यवसाय आहे. नफा चांगला मिळतो, आणि ग्राहक कायमस्वरूपी आहे. स्वतःच छोटं शॉप सुरु करून व्यवसाय सुरु करता येईल

गुंतवणूक रु. ५०,०००/-
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकेल
__________

६. भाजीपाला, फळे विक्री (ट्रेडींग)
स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा बाजारपेठेतून ठोक भावात भाजीपाला फळे खरेदी करून किरकोळ मार्केट मध्ये विक्री करावी. नफा चांगलं आहे आणि ग्राहकांची कमतरता नाही. फक्त एखादा चांगला ब्रँड तयार करावा. भाजीपाल्यासाठी ब्रँड बनवून विक्री केल्यास चांगले मार्केट मिळेल. मार्केटिंग वर भर द्यावा. तसेच कालांतराने होम डिलिव्हरी सुरु करता येईल.

गुंतवणूक -
ब्रँड बनवून विक्री करावयाची असल्यास रु. १५-२५ हजार
__________

७. मेन्स फॅशन ऍक्सेसरीज (ट्रेडिंग)
पुरुषांसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे बेल्ट, पर्स/वॅलेट, गॉगल, घड्याळ, ब्रेसलेट, चेन ई. व्होलसेल मार्केट मधून ठोक भावात आणून तुम्ही स्थानिक बाजारात विक्री करू शकता. यात मार्केट आणि नफा भरपूर आहे.

गुंतवणूक - रु. २५-५० हजार.
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकते.
__________

८. फॅशन ऍक्सेसरीज (ट्रेडिंग)
फॅशन ऍक्सेसरीज फॅशन संबंधी सर्व वस्तू येतात. महिला व पुरुष दोघांसाठी सुद्धा. होलसेल मार्केट मध्ये या वस्तू खूप स्वस्त मिळतात. स्थानिक मार्केट मध्ये किरकोळ दारात विक्री करताना दुप्पट तिप्पट नफा मिळू शकतो. गुंतवणुकीची क्षमता असल्यास मोठ्या प्रमाणावर सुद्धा हा व्यवसाय करता येईल

गुंतवणूक - रु. ४०-५० हजार
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकते.
__________

९. खेळणी (ट्रेडिंग)
होलसेल मार्केट मधून तुम्ही विविध प्रकारची खेळणी आणून स्थानिक मार्केट मध्ये विकू शकता. खेळणी मध्ये व्यवसाय मोठा आहे. ग्राहक चांगले मिळतात. थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे नफा सुद्धा चांगला मिळतो.

गुंतवणूक - रु. ४०-५० हजार
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकते.
__________

१०. लेदर प्रोडक्टस (ट्रेडिंग)
लेदर प्रोडक्टस ला मार्केट मध्ये खूप मागणी आहे. थेट उत्पादकांकडून खरेदी केली तर चांगला डिस्काउंट मिळतो. स्थानिक बाजारपेठेमध्ये लेदर उत्पादनांना नेहमीच मागणी असते. तसेच महिलांमध्येही लेदर उत्पादनांची क्रेज आहे.

गुंतवणूक - रु. ४०-५० हजार
छोटेखानी दुकान सुरु करता येईल.
चांगल्या प्रकारे शॉप सुरु करायचे असेल तर गुंतवणूक वाढू शकते.
__________

११. मोबाईल, TV, फ्रिज रिपेअरिंग (सर्व्हिस)
दररोज च्या वापरातल्या या वस्तूंच्या दुरुस्ती साठी खूप मागणी असते. चांगले ट्रेनिंग घेऊन हा व्यवसाय सुरु करता येईल. मोबाईल रिपेअरिंग व TV फ्रिज रिपेअरिंग हे दोन स्वतंत्र व्यवसाय आहेत.

गुंतवणूक - रु. १५-२० हजार

स्थानिक परिसरातील चांगल्या प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण घ्यावे.
_________

१२. पुस्तके विक्री
पुस्तकांच्या विक्रीचे छोटेखानी दुकान सुरु करू शकता. यामध्ये शैक्षणिक पुस्तके, ऐतिहासिक पुस्तके, कादंबरी, प्रशासकीय अभ्यासक्रमाची पुस्तके ई पुस्तकांची विक्री करू शकता.

गुंतवणूक - रु. ५० हजार
__________

१३. टाइपिंग सर्व्हिस (सर्व्हिस)
कोणतेही कागदपत्र, शासकीय कागदपत्र, माहिती, अग्रीमेंट, व्यवसायिकांची कागदपत्रे इत्यादी टाईप करून देणे. यासाठी तुम्हाला टाइपिंग चा कोर्स करणे आवश्यक आहे. स्थानिक परिसरात टाइपिंग क्लासेस असतील तेथून कोर्स करून घ्यावा.

गुंतवणूक - रु. ३०-५० हजार
__________

१४. डिझाईनिंग (सर्व्हिस)
डिझाईनिंग सेक्टर मध्ये व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत. यासाठी तुम्हाला "कोरल ड्रॉ" सारख्या डिझाईन सॉफ्टवेअर चा कोर्स करणे आवश्यक आहे. लोगो डिझाईन, ब्रोशर, व्हिजिटिंग कार्ड्स, इमेजेस इत्यादी प्रकारच्या डिझाईन साठी संधी आहेत.

गुंतवणूक - कोर्स शुल्क रु. ३-४ हजारांच्या जवळपास असते.
कॉम्प्युटर इंटरनेट सेटअप साठी रु. ३०-४० हजार.

स्थानिक परिसरात सॉफ्टवेर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कोर्स करावा.
__________

१५. कन्सल्टिंग / मार्गदर्शन / ट्रेनिंग
तुमच्याकडे एखादी कला असेल, ज्ञान असेल तर त्यासंबंधी कन्सल्टिंग किंवा ट्रेनिंग सेंटर सुरु करा. हे ज्ञान किंवा कला कोणत्याही क्षेत्रातील असू शकेल. फक्त तुम्हाला त्यासंबंधी पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे.

गुंतवणूक - बिलकुल नाही
ऑफिस सेटअप करणार असाल तर त्यासाठी लागणारा खर्च

____________________

महत्वाच्या टिप्स : -
१. हे व्यवसाय तुम्ही स्वतः माहिती घेऊन कधीही सुरु करू शकता. यासाठी मार्गदर्शनाची गरज आहेच असे काही नाही.
२. मी कोणत्याही प्रकारच्या व्यवसायविषयी चर्चेसाठी मी बेसिक कन्सल्टिंग शुल्क घेतो, जे रु. ५,०००/- आहे. हे शुल्क तुम्हाला व्यवसायाची प्राथमिक आणि माहिती देण्यासंबंधी किंवा चर्चेसाठी असते. यामध्ये मी तुम्हाला चर्चेसाठी अडीच तास वेळ देतो. त्यामुळे 'माहिती द्या" असले मेसेज करून फायदा नाही. प्राथमिक माहिती दिलेली आहे त्यावर अभ्यास करून पुढची पावले टाकू शकता.
४. तसेच या व्यवसायांसाठी कन्सल्टिंग ची गरज नाही, फक्त व्यवसायासंबंधी काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही या कन्सल्टिंग चा लाभ घेऊ शकता, आग्रह नाही. यात कोणतेही प्रशिक्षण येत नाही. प्रशिक्षण आणि कन्सल्टिंग वेगळे आहे.
५. व्यवसायाबद्दल दोन ओळीत माहिती दिलेली आहे. त्यावर थोडा विचार केल्यास तुम्हाला स्वतः माहिती गोळा करायला अवघड नाही.
६. ट्रेडिंग व्यवसायासाठी कोणते प्रशिक्षण नसते. फक्त हे व्यवसाय कसे करावेत यासंबंधी तुम्हाला कन्सल्टिंग ची गरज भासू शकते.

__________

धन्यवाद

श्रीकांत आव्हाड
Business Consultant

रॉजलीन बिझनेस सोल्युशन्स
७७४४०३४४९०

कार्यालय
पुणे, अहमदनगर

(All rights are reserved. Violation of copyright will result into legal action)