सकाळी ' शतक ' पार चा धक्का - संध्याकाळी ठोकले कोरोना ने द्विशतक : नव्याने 114 रूग्ण

सकाळी ' शतक ' पार चा धक्का - संध्याकाळी ठोकले कोरोना ने द्विशतक : नव्याने 114 रूग्ण

आज पंढरपूर करांच्या दृष्टीने सर्वात धक्कादायक दिवस ठरला.  गेल्या दोन दिवसापासून घेण्यात आलेले स्वॅप टेस्टचे निकाल आज सकाळी जाहीर करत असताना प्रशासनाने 115 रुग्णसंख्या जाहीर केली तर आज दिवसभर घेतलेल्या रॅपिड  टेस्टनंतर आज संध्याकाळी सात वाजता नव्याने 114 रूग्ण समोर आल्याचे प्रशासनाने कळविले आहे. आज लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने शहराच्या विविध भागांमध्ये 803  टेस्ट घेतला त्यापैकी 114 रूग्ण बाधित असल्याचे समोर आले .  त्या सर्व टेस्ट आता rt-pcr मध्ये पाठवून रिपोर्ट मागून घेण्यात येणार आहेत .आज आज मनीषा नगर आणि गजानन महाराज  मठ अशा शहरातील भागांसह  एमआयटी  केअर सेंटर , आढीव याठिकाणी टेस्टचे कॅम्प आयोजित करण्यात आले होते. दिवसभराच्या या टेस्टमधून 114 नवे रुग्ण समोर आले . त्यामुळे आज दिवसभर जाहीर झालेल्या रुग्णांची संख्या 200 च्या वर गेली आहे तर एकूण रुग्ण संख्या एक हजार पर्यंत पोहोचली आहे