सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेकडून अटक

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेकडून अटक

नवी मुंबई: पोलीस आयुक्तलयाच्या नेरुळ आणि सानपाडा पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी सकाळी ४ चैन स्नॅचिंग घटना घडल्या होत्या. आरोपी सकाळी मोटारसायकल वर येऊन सकाळी मॉर्निंग वॉक करणार्‍या वृद्ध महिला व पुरुष त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचत होते. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नवी मुंबई गुन्हे शाखेने चार दिवसात तांत्रिक तपास करून एका आरोपीला अटक केली आहे. शिवाजी नगर गोवंडी मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी वाशीला येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून वाशी टोल नाका येथे आरोपी विजय चव्हाण वय वर्ष वीस याला अटक केली आहे. आरोपीने आतापर्यंत सहा चेन स्नॅचिंग  केले आहे हे तपासात आलं आहे. सदर  गुन्ह्यात त्याच्याकडून एकूण ४,३५,०००रुपयाचे सोन्याचे दागिने तसेच बजाज KTM मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.