अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदी ज्ञानेश्वर भगरे यांची निवड

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर दगडू भगरे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हा सहअध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे.

  

मागील वर्षी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या मंगळवेढा शहराध्यक्षपदी असताना मंगळवेढा येथे श्री संत दामाजी मंदिर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय वारकरी मेळावा उत्तम पध्द्तीने पार  पाडण्यात त्यांच्या सिंहाचा वाटा होता. संघटनात्मक कार्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष ह.भ.प सुधाकर इंगळे महाराज यांनी  ज्ञानेश्वर भगरे यांना सोलापूर जिल्हा सहअध्यक्ष पदी नियुक्त केले आहे.

   

निवडीनंतर भगरे म्हणाले, ” जिल्ह्यातील वारकरी मंडळाचे कार्य तसेच संप्रदायाचा विचार घरोघरी पोचविण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे ”.

  

 

सदरच्या निवडीबद्दल श्री संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प गहिणीनाथ औसेकर,ह.भ.प भागवत चवरे महाराज, जिल्हा अध्यक्ष जोतिराम चांगभले, जिल्हा सचिव ह.भ.प बळीराम जांभळे , सोलापूर शहर अध्यक्ष संजय पवार ,वारकरी फडकरी संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प भागवत चौरे,शहर सचिव मोहन शेळके, ह.भ.प बजीरंग माळी,सोलापूर शहर समन्वयक संजय केसरे, तालुकाध्यक्ष निलेश गुजरे, शहर उपाध्यक्ष मल्लिकार्जुन राजमाने, गोपाळ कोकरे, सचिव ज्ञानोबा फुगारे,सतीश पाटील, भिमराव पाटील यांच्या सह अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर भगरे यांचे अभिनंदन केले आहे.