शायर हरपला, प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन

शायर हरपला, प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन

प्रख्यात उर्दू कवी, लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. इंदौरी यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी आज सकाळी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांचे हे ट्वीट आता अखेरचे ठरले आहे.

'अचानक लक्षणे जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे

ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे' असं इंदौरी म्हणाले होते.