पंढरपूर तालुक्यातील अल्पदरात डिजे मिळवून देतो म्हणून फसवणूक करून लूट करणाऱ्या गुन्हा दाखल...

पंढरपूर तालुक्यातील अल्पदरात डिजे मिळवून देतो म्हणून फसवणूक करून लूट करणाऱ्या गुन्हा दाखल...

पंढरपूर: तालुक्यातील अल्पदरात डिजे मिळवून देतो म्हणून फसवणूक करून लूट करणाऱ्या मोक्कांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी तालुका पोलिसांनी पकडला आहे गेल्या अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत सचिन काळे त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
2019 साली पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे डीजे व ऍम्प्लिफायर मिळवून देतो असे आमिष दाखवून पुळुज गावात बोलून घेतले त्यानंतर लुटमार करण्याच्या उद्देशाने चौदा ते पंधरा जणांनी मिळून चाकु कोयते व लाटी याचा धाक दाखवून सदर फिर्यादी सुटले होते. त्यातील सर्व आरोपींना पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 13 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यातील मुख्य आरोपी असणारा सचिन काळे हा पोलिसांना अडीच वर्षापासून गुंगारा देत होता. त्याला 21 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.