"फिरस्त्या" चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये एकूण 53 पुरस्कार

"धडपड करणाऱ्यांच्या हाताला काहीतरी लागतं भाऊ".. असं म्हणणारा नायक  आणि 'मोठी स्वप्नं पाहणं आणि पाहिलेली स्वप्नं सत्यात उतरवण्यातील वास्तविकतादर्शविणारा तसेच सध्याच्या 'नैराश्यमय' 'न्यूनगंडात्मक' आणि 'नकारात्मक मानासिकते' विरोधात  'प्रेरणादायी' आणि 'सकारात्मक विचारप्रखरतेने मांडणारा लेखक आणि  दिग्दर्शक विठ्ठल मच्छिन्द्र भोसले यांचा "फिरस्त्याचित्रपट लवकरच येत आहे.

"फिरस्त्याचित्रपट हा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादायी गोष्ट आहे. ग्रामीण भागात निरक्षर आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात  जन्माला आलेल्या मुलाची खऱ्या अनुभवांवर आधारित ही गोष्ट आहे.

प्रदर्शनापूर्वीच "फिरस्त्या" ने  भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि रोमानिया  या ११  देशांमधील  २४ इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये एकूण ५३ पुरस्कार जिंकलेले आहेतयामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट- १८ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- १७ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथा - पुरस्कार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण- पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट  संकलन १असे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच  "फिरस्त्या" ची फायनॅलिस्ट म्हणून अमेरिका, रशिया, स्वीडन आणि तुर्की   या देशांमधील   फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये निवड झालेली आहे.