सुशांतच्या चाहत्यांचा पहिला दणका; 'सडक-2'च्या ट्रेलरला 8 तासात 24 लाख डिसलाईक्स!

सुशांतच्या चाहत्यांचा पहिला दणका; 'सडक-2'च्या ट्रेलरला 8 तासात 24 लाख डिसलाईक्स!

मुंबई | महेश भट्ट यांचा सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. थोड्या वेळापूर्वी रिलीज झालेला 'सडक 2' चा ट्रेलर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिलेला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेलरवर लाईक्स कमी आणि डिसलाईक्स जास्त असल्याचं चित्र दिसून आलं.

सुशांतच्या चाहत्यांनी सडक 2 च्या ट्रेलरला चांगलीच नापंसती दाखवली आहे. अवघ्या 8 तासांमध्ये या ट्रेलरला 21 लाख डिसलाईक्स मिळाले आहेत. तर या ट्रेलरला 1.3 लाख लाईक्स मिळाले आहेत. सडक 2 चा ट्रेलर कालच रिलीज करण्यात येणार होता. मात्र संजय दत्तला कॅन्सर झाल्याची बातमी कळताच आज हा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला होता. यामध्ये आलिया भटट् तसंच महेश भट्ट यांच्यावरही अनेक आरोप लावण्यात आले होते. या सर्व प्रकारानंतर महेश भट्ट यांचा सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. मात्र सुशांतच्या चाहत्यांनी चांगलाच दणका दिला असल्याचं पहायला मिळालंय.