शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट.

शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट.

जळगाव: महाराष्ट्र राज्य शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन विविध केंद्र व राज्य स्तरीय मागण्यांवर चर्चा केली.  शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना बस प्रवास व टोल सवलत मिळावी ,शासकीय कृषी विषयक समित्यांवर प्रतिनिधित्व मिळावे,बियाणे उत्पादनात शासकीय बियाणे उत्पादनाप्रमाणे लाभ मिळावेत.यासह केंद्रीय प्रधानमंत्री पीकविमा योजना 2014 पूर्वी मागील शासन काळात प्रस्तावित असतांना जोखीम स्तर 70 ते 90 टक्के अपेक्षित होता तो कमी करून 70 ते 80 टक्के म्हणजे कमी करण्यात आल्याचे चर्चा करण्यात आले . यावेळी शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष ऍड प्रकाश पाटील(धुळे),उपाध्यक्ष प्रल्हाद वरे (बारामती),राज्य कार्यकारिणी सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील(जळगाव) ,मोह संवर्धन मंडळाचे संयोजक  बी जी महाजन(चुंचाळे) कृषी क्रांती हायटेक ऍग्रो प्रोड्युसर कंपनी (औरंगाबाद)चे  अध्यक्ष कृष्णा पवार (औरंगाबाद) उपस्थित होते.