HSC Result : उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

HSC Result : उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

HSC Result 2021 : राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या संध्याकाळी ४ वाजता जाहीर होणार आहे. बारावीला यंदा १४ लाख विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे बारावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावला जाणार आहे. Maharashtra HSC Result 2021सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जुलैपर्यंत निकाल लावायचा होता. मात्र काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे निकाल लावण्यास थोडा विलंब झाला. अकरावी आणि बारावीच्या आतापर्यंतच्या महाविद्यालयांनी स्तरावरील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले गेले आहे.