Hyundai च्या कारवर १ लाखांपर्यंत डिस्काउंट

ह्युंदाई आपल्या कारवर जूनमध्ये १ लाखांपर्यंत फायदे देत आहे. जाणून घ्या कोणते फायदे आहेत...

Hyundai च्या कारवर १ लाखांपर्यंत डिस्काउंट

करोना व्हायरस महामारीमुळे कारच्या विक्रीला जबरदस्त फटका बसला आहे. मे महिन्यात लॉकडाऊन नियमात केंद्र सरकारने कंपन्यांना थोडी सवलत दिली आहे. त्यामुळे ऑटो कंपन्यांनी आपली विक्री हळूहळू सुरू केली आहे. परंतु, मे मध्ये कार विक्रीची आकडेवारी कंपन्यासाठी निराशाजनक राहिली आहे. विक्रीला गती देण्यासाठी कंपन्यांना ग्राहकांना वेगवेगळी स्कीम्स देणे सुरू केले आहे. ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी मारुती कंपनी पासून ते टाटा पर्यंत सर्वच कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळे बेनिफिट्स मिळत आहेत. कंपन्या डिस्काऊंटसोबतच फायनान्सिंग ऑप्शन देत आहे. मे महिना गेला असून जूनमध्ये सुद्धा कारवर आकर्षिक ऑफर दिले जात आहे. ह्युंदाई आपल्या कारवर जूनमध्ये १ लाखांपर्यंत फायदे देत आहे. जाणून घ्या कोणते फायदे आहेत...

​Santro

जून महिन्यात सँट्रो कारवर ह्युंदाई कंपनी एकूण ३० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देत आहे. यात १० हजारांचा कॅश डिस्काऊंट, १५ हजार रुपयांचा बोनस आणि ५ हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. चीनमधील करोना व्हायरस भारतात येऊन आता दोन ते अडीच महिने झाले आहे. या अडीच महिन्यात ऑटो कंपन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी कंपन्या ग्राहकांना कार खरेदीसाठी वेगवेगळ्या स्कीम देऊन आकर्षित करीत आहेत.

​Grand i10

ह्युंदाईच्या या कारवर जून महिन्यात ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकते. यात ४० हजार रुपयांचा डिस्काऊंट, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर बोनस, आणि ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. ही कार केवळ १.२ लीटर पेट्रोल इंजिन आणि ४ व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत ५.८७ लाख रुपया दरम्यान आहे. ग्रँड आय१० ही कार फॅमिली कार म्हणून ओळखली जाते. ग्रँड आय टेनची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने ६० हजारांचा डिस्काउंट दिला आहे.

​Grand i10 NIOS

ह्युंदाईच्या या नवीन कारवर २५ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळत आहेत. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट याचा समावेश आहे. या कारची सुरुवातीची किंमत ५.०७ लाख रुपये आहे. ही कार तीन इंजिन पर्यायात उपलब्ध आहे. या कारचा आकर्षक लूक अनेकांना आपल्या मोहात पाडू शकतो. या कारचा कलर, इंटेरियर डिझाईन, या कारचे मायलेज, स्पीड सर्व काही जबरदस्त आहे. ही कार खरेदी करायची असले तर या कारवर जून महिन्यात २५ हजारांचा डिस्काऊंट तुम्हाला मिळू शकतो.

Elite i20

ह्युंदाईच्या या प्रीमियम हॅचबॅकवर या महिन्यात ३५ हजार रुपयांपर्ंयत फायदे मिळू शकतात. या कारवर कंपनी १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट ऑफर केली जात आहे. दरम्यान, या प्रीमियम कारवर ६.५० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध आहे. ह्युंदाईची लवकरच नवीन आय २० कार आणली जाणार आहे. यासाठी आय२० चे मॉडल मर्यादीत व्हेरियंटसची विक्री केली जात आहे. ही कार सुद्धा तुम्ही खरेदी करु शकता.

​Elantra

ह्युंदाई आपली या जबरदस्त सिडान वर सर्वात जास्त म्हणजे तब्बल १ लाख रुपयांचे बेनिफिट्स देत आहे. या १ लाख रुपयांच्या बेनिफिट्समध्ये ४० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि २० हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट याचा समावेश आहे. ह्युंदाई एलांट्रा १५.८९ लाख रुपयांपासून सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. या कारवर सर्वात जास्त १ लाख रुपयांपर्यंत बेनिफेट्स मिळत असल्याने ही संधी तुमच्यासाठी खास आहे. त्यामुळे गाडी खरेदी करण्याचा विचार डोक्यात असल्यास ही कार तुम्ही खरेदी करु शकता.

​स्पेशल ऑफर

ह्युंदाई जूनमध्ये मेडिकल प्रोफेशन्लसाठी एक स्पेशल ऑफर देत आहे. यात अनेक ऑफरचा समावेश आहे. तसेच करोना व्हायरस असल्याने ईएमआय विमाची सुविधा देत आहे. तसेच जर तुमची नोकरी गेली तर कंपनी तीन ईएमआय भरण्यास मुदतवाढ देते. ह्युंदाईच्या या कारवर मिळणारे बेनिफिट्स ३० जूनपर्यंत आहेत. ऑफर शहर, डिलरशीप, कारचा प्रकार आणि कलर, या हिशोबाप्रमाणे वेगवेगळे असू शकते. जून महिन्यात ह्युंदाईच्या कोणत्या कारवर किती डिस्काऊंट मिळू शकतो. याची माहिती कंपनी डिलरशीपशी संपर्क साधून मिळवता येईल. या ठिकाणी दिलेल्या कारच्या किंमती या दिल्ली एक्सशो रुमच्या आहेत.