नाना पटोलेंना ओबीसीबद्दल कळवळ असेल तर सरकारमधून काँग्रेसने बाहेर पडावे :- चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोलेंना ओबीसीबद्दल कळवळ असेल तर सरकारमधून काँग्रेसने बाहेर पडावे :- चंद्रशेखर बावनकुळे

भंडारा: नाना पटोले यांनी मान्य केले की,आमच्या सरकारी वकीलांनी बरोबर न मांडल्यामुळे ओबीसी आरक्सण गेलयं,तेव्हा पटोलेंना ओबीसी समाजाबद्दल ऐवढी कळवळ आहे. तर सरकारमधून बाहेर पडावं असा आव्हान भाजप नेते चंद्रकार पाटील यांनी नाना पटोले यांनी भंडारा येथे आयोजित पत्रपरीषदेतून दिला.

वीज भरण्याची जबाबदारी ही राज्यसरकारची असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून गावामधील पाणी आणि विजबिलाचे पैसे राज्यसरकारने भरायचे असतात।असे नियम असतानादेखील महाविकास आघाडी सरकार पथदिव्याचे विजबिल न भरता सरपंचाकडून दोन हजार कोटी रुपये लाटण्याचा महाविकास आघाडी सरकारची योजना असल्या आरोप बावनकुळे यांनी करीत केंद्र सरकारने गावाच्या विकासासाठी पाठवलेल्या पैशावर डल्ला मारण्याचा सरकारचा डाव असल्याचाही आरोप करून महाविकास आघाडी सरकारवर टिकास्र सोडले...आतातरी मुख्यमंत्र्यांनी बाहेर निघून जनतेच्या समस्या सोडविल्या पाहीजेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे।मुख्यमंत्र्यांनी आता तरी बाहेर निघून राज्यातील 12 कोटी जनतेच्या समस्या सोडविल्या पाहीजेत।कारण हे राज्य महाविकास आघाडी सरकारने 25 वर्ष मागे नेल्याचाही आरोप त्यांनी केलाये.