जर मुंबईत सेनेची ताकद तर महापालिकेची निवडणूक लढवा, राज ठाकरेंच्या अंगणातून चंद्रकांतदादांचं राऊतांना चॅलेंज

जर मुंबईत सेनेची ताकद तर महापालिकेची निवडणूक लढवा, राज ठाकरेंच्या अंगणातून चंद्रकांतदादांचं राऊतांना चॅलेंज

मुंबई : जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं. राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी काहीशी खोचक टिप्पणी केली होती. पत्रकारांनी याच मुद्द्यावर चंद्रकांतदादांना छेडलं. त्यावर चेहऱ्यावर काहीसा राग दाखवत दादांनी राऊतांना थेट निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं.

“जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. मराठीमध्ये एक म्हण आहे, दंड थोपटले…. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी”, असा हल्लाबोल चंद्रकांतदादांनी राऊतांवर केला.भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर बोलताना दिली होती. राऊतांची हीच प्रतिक्रिया चंद्रकांतदादांना झोंबली. त्यांनी राऊतांवर थेट हल्ला चढवत आपले दंड तपासण्याचा सल्ला दिला.

मी विद्यार्थी परिषदेत होतो. तेव्हा राज ठाकरे BVS चे काम करायचं. तेव्हापासून माझ्या मनात यांच्याबद्दल आकर्षण होतं, व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आहेच.. राज ठाकरेंना भूमिका बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते व्हायला हवे हे मी माणूस म्हणून सांगणं वेगळं.. सध्या मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला ते ही जातात मी ही जातो, आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी.. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली.