IND vs ENG : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह प्रमुख खेळाडू वन डे मालिकेत नाही खेळणार? थेट IPL 2021 मध्ये भेटणार

IND vs ENG : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह प्रमुख खेळाडू वन डे मालिकेत नाही खेळणार? थेट IPL 2021 मध्ये  भेटणार

India vs England, ODI series : भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना ४ ते ८ मार्च या कालावधीत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया मर्यादित षटकांच्या ( वन डे व ट्वेंटी-20) मालिकेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. BCCIनं पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी नुकताच संघ जाहीर केला आहे. ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि वरुण चक्रवर्थी यांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे. यानंतर होणाऱ्या वन डे मालिकेसाठीही लवकरच संघ जाहीर केला जाईल, परंतु त्या मालिकेत रोहित शर्मा ( Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) यांच्यासह टीम इंडियातील काही खेळाडू खेळणार नाहीत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस; म्हणाले...

IPL 2020 पासून आहेत बायो बबलमध्ये
कोरोना व्हायरसच्या संकटात BCCIनं आयपीएलचं १३वं पर्व यूएईत यशस्वीपणे घेऊन दाखवलं. कोरोना नियमांचं काटेकोर पालन करून ही स्पर्धा खेळवण्यात आली आणि त्यानंतर टीम इंडियाचे शिलेदार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाले. दोन-अडीच महिन्यांच्या या दौऱ्यानंतर मायदेशात परतून एका आठवड्याची विश्रांती घेत सर्व खेळाडू पुन्हा राष्ट्रीय कर्तव्यावर परतले. भारत-इंग्लंड मालिका २८ मार्चला संपणार आहे आणि त्यानंतर १० दिवसांत आयपीएलचं १४ वं पर्व सुरू होईल. त्यामुळे खेळाडूंचा एका बायो-बबलमधून दुसऱ्या असा प्रवास सुरूच राहणार आहे. विराट कोहलीनं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलं मागे

रोहित, जसप्रीत यांना वन डे मालिकेत विश्रांती
सततच्या दौऱ्यामुळे आणि आयपीएल २०२१साठी खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. बुमराहनं चौथ्या कसोटीपूर्वी BCCIकडे वैयक्तिक कारणास्तव सुट्टी मागितली होती आणि ती मान्य झाल्यानं तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही. त्याला ट्वेंटी-20 व वन डे मालिकेतही विश्रांती मिळणार आहे. बीसीसीआयनं ट्वेंटी-20 मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात बुमराहचा समावेश नाही. रोहितलाही वन डे मालिकेत विश्रांती मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत यांनाही वन डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आदी नावंही चर्चेत आहेत.

ट्वेंटी-20 व वन डे मालिकेचं वेळापत्रक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका अहमदाबाद येथे होणार आहे. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ पुण्यासाठी रवाना होईल. २३ , २६ आणि २८ मार्चला वन डे सामने होतील.

ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर