इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा

इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा

मुंबई : इराणहून समुद्री मार्गे नवी मुंबईत ड्रग्जची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 283 किलो वजनाचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 2 हजार कोटी रुपये किंमत असलेले हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदरावरुन रस्ते मार्गाने हे अंमली पदार्थ पंजाबला पाठवले जाणार होते, अशी माहिती आहे.

टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये 283 किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पंजाबच्या तरण तारन भागातील ड्रग पुरवठादार प्रभजीत सिंग याला अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशातील दोन इतर आरोपींनाही बेड्या ठोकल्याची माहिती आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालय (DRI) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये अफगाणिस्तानमधून आणलेले 290 किलो हेरॉईन आढळले. हा सर्व साठा कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.