जिगरी चा फर्स्ट लूक रिलीज

जिगरी चा फर्स्ट लूक रिलीज

जिगरी चा फर्स्ट लूक रिलीज

मैत्री आणि मैत्री प्रेम या विषयावर आधारित असलेल्या तसेच अस्सल गावरान मातीतल्या विषयावर आधारित असलेल्या जिगरी या फिल्मचा आज दिनांक 9 रोजी फर्स्ट लुक रिलीज झाला आहे

 

साधारण चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व पोकलेन ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या प्रवीण चौगुले यांचा लिखित असलेला जिगरी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे. तीन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हा फिल्म लवकरचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नव्यानेच येणारे अभिनेते राहुलराजे यांच्यासाठी ही फिल्म एक मैलाचा दगड ठरणार आहे.

 

अभिनेते राहुल राजे यापूर्वीही येरेयेरेपैसा या फिल्ममध्ये तसेच उरली तर लहान-मोठ्या मालिकांमध्ये हे त्यांनी अभिनय केला आहे तसेच जिगर या फिल्ममध्ये दीपा ची मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्या पूजा चांदुरकर ह्या तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या अभिनेतेत्या आहेत.  या फिल्ममध्ये त्यांची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडणारी असणार आहे. 

 

शहा अँड शहा कंपनी ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे रश्मी अजय शहा आणि हिमांशू प्रकाश शहा हे निर्माते आहेत,  तसेच मुख्य भूमिकेत राहुल राजे,  विनोद शहा, पूजा चांदुरकर  सोबतच ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा  फेम गौरव मोरे आदींनी आपल्या अभिनयाचा ठसा या चित्रपटमध्ये हे ठेवला आहे. अस्सल गावरान मातीतील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे तसेच मैत्रीचे , मैत्री प्रेमाचे दर्शन घडवणारे तसेच मराठी फिल्म मध्ये हे एक वेगळे नाव कमवणार आहे असे दिसते.

 

 या चित्रपटाची कथा पटकथा संवाद प्रवीण चौगुले लिखित आहे तसेच निलेश कोचळे यांनी संवाद लेखनासाठी महत्वाचे साहाय्य केले आहे संगीत रोहित नागभिडे व फिल्ममधील गीतांना आदर्श शिंदे यांनी आवाज  दिलेला आहे,  कलादिग्दर्शन मठपती, नृत्यदिग्दर्शन  प्राण यांनी सांभाळले आहे  तर चित्रपटाचे चित्रीकरण शांताराम भोसले यांनी केले आहे

 

 एका वाक्यात सांगायचे झाले तर अतिशय रोमहर्षक व प्रेक्षकांना विचार करा लावणारी ही फिल्म आहे असे अभिनेते राहुलराजे व लेखक प्रवीण चौगुले यांनी सांगितले.