साताऱ्यात केरळ पोलिसांकडून गोल्ड पीएयुरिटी तपासणी मशीन जप्त.

साताऱ्यात केरळ पोलिसांकडून गोल्ड पीएयुरिटी तपासणी मशीन जप्त.

जुलै महिन्यात केरळमधील एका बँकेमधून सोने चोरीची घटना घडली होती..  याचा तपास करण्यासाठी केरळ पोलीस महिन्यापासून साताऱ्यात तळ ठोकून आहेत.. यातील प्रमुख आरोपी निखिल जोशी याला ताब्यात घेण्यात आले आहे.. साताऱ्यातील सराफ राहुल घाडगे यांच्या ज्वेलरीच्या दुकानात हे सोने विकले गेले असून यामध्ये साताऱ्यातील डॉ.निलेश साबळे यांचादेखील सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.. डॉ.साबळे हे फरार असून केरळ पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.. चोरीचे काही सोने जप्त करण्यात आले असून सोने तपासण्यासाठीची गोल्ड पीएयुरिटी तपासणी मशीन जप्त करण्यात आली असल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली आहे.. या छापेमारीमुळे सातारा सराफ बाजारपेठेत खळबळ उडाली आहे..