अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग

अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग

आता पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे तर अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्ण पाऊस येत असल्याने बळीराजा आनंदीत झाला असून खरीप हंगामाची लगबग आता बळिराजाची सुरू आहे आहे, तर विविध संकटातुन शेतकरी सावरत पुन्हा एकदा पेरणीसाठी सज्ज झालाचे चित्र अमरावतीत आहे,

 अमरावती जिल्ह्यांत सोयाबीन साठी प्रस्तावीत क्षेत्रानुसार एकूण 2.70 लक्ष हेक्टरससाठी 75 किलो प्रति हेक्टरप्रमाणे 2 लाख 15000 क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून बियाणे बदलाचे प्रचलित प्रमाणानुसार 1 लाख 30 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आता सोयाबीनचे दर वाढलेले असल्याने शेतकरी बांधव स्वत:कडील सोयाबीन विकून टाकण्याची शक्यता लक्षता घेता ज्या शेतकऱ्यांकडे मागील हंगामातील चांगले सोयाबीन उपलब्ध असेल त्यांनी वाढीव भावाला बळी न पडता स्वत:कडील सोयाबीनची उगवणक्षमता तपासून ते पेरणीसाठी राखुन ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे

 मागील वर्षी महाबीज आणि इतर बियान्याच्या किमती या जवळपास सारख्या होत्या .त्यात मुबलक बियाणे देखील उपलब्ध होते .परंतु मागील वर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने आता बियाण्याच्या किमतीही वाढल्या आहे. मागील वर्षी महामंडळाच्या महाबीज सोयाबीन ची किंमत दोन हजार दोनशे पन्नास पर्यंत होती तर इतर कंपनीची किंमत देखील जवळपास होती. परंतु यंदा मात्र या खाजगी कंपन्यांचे दर प्रचंड वाढले आहे त्यामुळे यावर्षी 3300 ते चार हजार पर्यंत सोयाबीनच्या 30 किलोची बॅग मिळत असल्याने बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाबीज बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्र समोर प्रचंड गर्दी केली होती.