महाराज भागवत कथा सांगायला आला; अन् विवाहितेला घेऊन गेला...

महाराज भागवत कथा सांगायला आला; अन् विवाहितेला घेऊन गेला...

भंडारा | भागवत कथेच्या माध्यमातून नैतीकतेचे धडे देणाऱ्या एका महाराजाने एका विवाहित महिलेला घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराजाने सप्ताहात नैतीकतेचे धडे दिले आणि सप्ताह संपताच विवाहितेला घेऊन पलायन केले. संपूर्ण माहिती अशी आहे की, 

भंडाराजवळच्या मोहूदरा येथे भागवत कथा सप्ताह चालू होता या दरम्यान येथे कथा सांगायला आलेले महाराज आणि त्याच गावातील विवाहित महिला आणि महाराज यांचे सूत जुळून आले होते. दिनेश  मोहतुरे असं या महाराजाचं नाव असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पळून गेलेल्या महिलेचा महाराजांचा पोलीस शोध घेत आहेत 

मोहूरदा येथे दरवर्शीप्रमाणे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथेत महाराज आपल्या वाणीने सगळ्यांचा मंत्रमुग्ध करत असत. अशातच त्यांची नजर एका महिलेवर गेली. महाराजांनी या महिलेला आपल्या मोहपाशात अडकवले.

महाराजाने अगोदर कुटुंबीयांशी संबंध प्रस्थापीत केले. त्यांनंतर त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणेही वाढले होते. महाराजांशी सदर महिला एकदोनदा बोलताना पाहून घरच्यांना संशय आला होता. मात्र, महिला पळून गेल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. महिलेला एक मुलगीही आहे.