सोलापूर काँग्रेस आणि प्रहार संघटनेचा वळसंग टोल नाक्यावर मोर्चा..

सोलापूर काँग्रेस आणि प्रहार संघटनेचा वळसंग टोल नाक्यावर मोर्चा..

सोलापूर ते अक्कलकोट या नूतन तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर 50 टक्के कामे पूर्ण झाले असताना टोल नाका सुरू करण्यात आला आहे.40 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दोन टोल सुरू करण्यात येत आहेत.याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर-अक्कलकोट या मार्गावरील वळसंग येथील टोल नाक्यावर मोर्चा काढण्यात आला. स्थानिक नागरिकांना मासिक पास देण्यात यावा.येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता सोडण्यात यावा.चुकीच्या पद्धतीने सर्व्हिस रोड ची निर्मिती करण्यात आली आहे.ती व्यवस्थित करावी.पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या नाल्याची अर्धवट कामे पूर्ण करावेत.आदी मागण्यांसाठी बुधवारी वळसंग या टोलनाक्यावर काँग्रेस आणि प्रहार संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.