एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईत 2 ड्रग पेडलर्सना अटक, कारवाईदरम्यान, 2 अधिकारी किरकोळ जखमी

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईत 2 ड्रग पेडलर्सना अटक, कारवाईदरम्यान, 2 अधिकारी किरकोळ जखमी

मुंबई : ड्रग्स विक्री तसेच तस्करी प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईमधील खारघर आणि डोंगरी भागात दोन ड्रग पेडलर्सना अटक केलं आहे. यामध्ये एका नायजेरीयन व्यक्तीचा समावेश असून या दोन आरोपींकडून 50 लाख रुपयांचं कोकेन ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. एनसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीचं मोठं रॅकेट उघडं पडण्याची शक्यता आहे. 

मिळाललेल्या माहितीनुसार मुंबई स्थित एनसीबीला खारघर आणि डोंगरी भागात डग्स तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर या तस्करांना अटक करण्यासाठी एनसीबीने सापळा रचला. नियोजित योजनेनुसार एनसीबीने खारघर आणि डोंगरी या भागात धडक कारवाई केली. यामध्ये त्यांच्या हाताला दोन ड्रग्स पेडलर आले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश आहे. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 50 लाख रुपये मूल्य असलेले कोकोन ड्रग्स जप्त केले.

विशेष म्हणजे एनसीबीने ड्रग्स तस्करांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. तसेच आपण आता पकडले जाणार हे समजल्यामुळे या ड्रग्स पेडलर्सनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना अटक करताना एनसीबी आणि ड्रग पेडलर्स यांच्यात झटापट झाली. यामध्ये दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले.