निंबर्गी येथे माता रेणुकादेवीची यात्रा उत्साहात संपन्न.

hpn

निंबर्गी येथे माता रेणुकादेवीची यात्रा उत्साहात संपन्न.
निंबर्गी येथे माता रेणुकादेवीची यात्रा उत्साहात संपन्न.

सोलापूर प्रतिनिधी: निंबर्गी (दक्षिण सोलापूर) येथे श्री माता रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मध्ये सामाजिक धार्मिक तसेच संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11/12/2019 रोजी देवीला लहान नैवैध्य  दाखविण्यात आला. तसेच त्याच दिवशी देवीचा भव्य असा छबिना काढण्यात आला. तसेच १२/१२/२०१९ या दिवशी देवीला मानाचा नैवैध्य दाखविण्याचा कार्यक्रम झाला तसेच त्याच  दिवशी मद उडविण्याचा तसेच रात्री कन्नड गाणी व कन्नड नाटकाचा कार्यक्रम हि सादर करण्यात आला होता. 
१३/१२/२०१९ रोजी अग्निकुंड प्रवेश व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विविध भागातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आई रेणुकाच्या गजरात अग्निकुंड प्रवेश करण्यात आला. अग्निकुंड प्रवेश पाहण्यासाठी अनेक लोक आले होते. अग्निकुंड प्रवेशानंतर अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. 
देवीचे मानाचे पुजारी विशवनाथ दऱ्याप्पा दुपारगुडे, शिवाप्पा साबळे यांच्या हस्ते आई रेणुकेची पूजा मोठ्या थाटात संपन्न झाली.
देवीच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष शशिकांत दुपारगुडे तसेच यदा दुपारगुडे, अरविंद दुपारगुडे, अशोक चलवदे, नागनाथ दुपारगुडे, रंजित दुपारगुडे, काशिनाथ साबळे, चंद्रकांत साबळे, राहुल दुपारगुडे, आनंद कांबळे, नंदकुमार साबळे, देवानंद दुपारगुडे यांच्या सहकार्यातून तसेच ग्रामस्थ व गावातील तरुणाच्या सहकार्यांने आई रेणुका मातेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.