सोलापुर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिकांच काम बंद आंदोलन

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परिचारिकांनी तब्बल दोन तास काम बंद आंदोलन केलं.
हे आंदोलन उद्या ही करण्यात येणार आहे.
परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
नवीन पदभरती,पदोन्नती,जुनी पेन्शन योजना,वाढीव महागाई भत्ता या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर येत्या 25 तारखेपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा परिचारिकांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान,परिचारिकांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे रुग्णांची कांही वेळासाठी गैरसोय झाल्याचं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिसून आलं.