सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनसाठी देशात 5 लाख लोकांची प्री बुकिंग, जाणून घ्या वैशिष्ट्य

सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनसाठी देशात 5 लाख लोकांची प्री बुकिंग, जाणून घ्या वैशिष्ट्य

कोरोनाच्या संकटकाळात लोकांची क्रयशक्ती कमी झाली असली तरी स्मार्टफोनच्या खरेदीसाठी मात्र झुंबड उडत आहे. सॅमसंग कंपनीने हिंदुस्थानमध्ये नुकताच फ्लॅगशिप सिरीजमधील Galaxy Note 20 लॉन्च केला. गेल्या आठवड्यात कंपनीने प्री बुकिंग घेण्यास सुरुवात केली होती. या स्मार्टफोनसाठी आतापर्यंत तब्बल 5 लाख लोकांनी प्री बुकिंग केल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सॅमसंग इंडियाचे मोबाईल बिझनेस संचालक आदित्य बब्बर यांनी सांगितले की, नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्री बुकिंग डबल झाले आहे. यापूर्वी गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या Galaxy Note 10 स्मार्टफोनसाठी अडीच लाख लोकांनी प्री बुकिंग केले होते असेही कंपनीने स्पष्ट केले. Galaxy Note 20 स्मार्टफोनची विक्री 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. Galaxy Note 20 सिरीजमधील स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 77 हजार 999 रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंट Galaxy Note 20 Ultra ची किंमत 1 लाख 4 हजार 999 रुपये आहे

Galaxy Note 20 ची वैशिष्ट्य
- यात 2400×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत 6.7 इंचाचा Infinity-O Super AMOLED+ डिस्प्ले दिला आहे.
- 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज दिला आहे.
- फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर दिला आहे. -
- फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून यात 64 मेगापिक्सल आणि दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे.
- फोनमध्ये 4300mAh बॅटरी दिली आहे.

Galaxy Note 20 Ultra ची वैशिष्ट्य
- फोनमध्ये 3088×1440 पिक्सल रेजॉलूशन असून 6.9 इंचाचा sAMOLED WQHD इनफिनिटी-O डायनामिक 2x कर्व्ड डिस्प्ले दिला आहे.
- 19.3:9 चा आस्पेक्ट रेशियो आणि 120Hzचा रिफ्रेश रेट दिला आहे.
- 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम असे दोन पर्याय दिले आहेत. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन 128 जीबी, 256 जीबी आणि 522 जीबीच्या स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो.
- फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 10 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
- फोनला 4500mAh बॅटरी दिली आहे.