नवले पुलाजवळ विचित्र अपघात,ट्रकची 5 ते 6 गाड्यांना धडक

नवले पुलाजवळ विचित्र अपघात,ट्रकची 5 ते 6 गाड्यांना धडक

पुणे, 06 ऑक्टोबर : पुणे (Pune) शहरातील नवले पूलाजवळ ( Navle bridge) विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने पाच ते सहा चारचाकी आणि दुचाकी वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील कात्रज बायपास रोडवर नवले पुलाखाली आज सकाळी पुन्हा एकदा विचित्र अपघात घडला. एका भरधाव ट्रकने जवळपास 5 ते 6 गाड्यांना जोराची धडक दिली. भरधाव ट्रक समोर येईल त्या वाहनांना चिरडत पुढे जात होता.

यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या अपघातामुळे नवले पुलाजवळ काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ क्रेन लावून ही वाहनं बाजूला हटवल्याने तिथली वाहतूक आता सुरळीत झाली आहे.